दयानंदचे 12वी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश.
विज्ञान 12, वाणिज्य 43, कला महाविद्यालयातील 6 विध्यार्थ्याचा समावेश !
लातूर १७ : फेब्रुवारी / मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत दयानंद विज्ञान , वाणिज्य व कला महाविद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष १९-२० मध्ये बारावी बोर्ड परीक्षेसाठी विज्ञान महाविद्यालयातून ७४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी ७३८ विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयाचा निकाल ९८.९२% लागला असून विभुते शुभम महादेव ९५. ८४ % गुण घेऊन महाविद्यालयात सर्व प्रथम आला आहे. लोमटे प्रतीक्षा हनुमंत ९४. ९२ % गुण घेऊन महाविद्यालयात सर्व व्दितीय आला आहे. तर हलगे श्रेयश सिद्धेश्वर ९४% गुण घेऊन सर्व तृतीय आला आहे. गणित विषययात १०० पैकी १०० गुण घेणारे तीन विध्यार्थी आहेत. ९०% पेक्षा अधिक गुण संपादन करणारे १२ विध्यार्थी आहेत तर ८५% पेक्षा अधिक गुण घेणारे ५४ विध्यार्थी आहेत.
दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने देखील घवघवीत यश संपादन केले आहे . बारावी बोर्ड परीक्षेसाठी १०२१ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ९९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयाचा निकाल ९७.२७% लागला असून महाविद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा मान पाटील मयूर रघुनाथ व शेटे प्रकाश सतीश यांनी ९६. ६२ % गुण मिळवून पटकावला असून काटकर सुरज संग्राम याने ९४. ७७ टक्के गुण घेऊन सर्वद्वितीय स्थान मिळविले तर महाविद्यालयांतून सर्व तृतीय ९४. ४६ टक्के समान गुण घेऊन मुळे लक्ष्मी बालाजी , पिसाळ नेहा आत्माराम व येवले आरती आत्माराम आले आहेत . ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन ४६ विद्यार्थी आणि ८५ % पेक्षा जास्त गुण घेणारे ८४ विद्यार्थी बँकिंग व SISE विषयात २०० पैकी २०० गुण घेणारे २५ विद्यार्थी आहेत. संस्कृत, पुस्तकपालन व लेखाक्रम,गणित व संख्याशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे २२ विद्यार्थी आहेत .
दयानंद कला महाविद्यालयाने बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये बारावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 412 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 408 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती व 335 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत महाविद्यालयाचा निकाल हा 82.10% लागलेला असून कु.चव्हाण दिशा दयानंद ने 94.92% गुण घेऊन महाविद्यालयात सर्व प्रथम व कु.सर्जे आरती गोपाळ व चि. नाईक प्रत्युक्ष श्रीकृष्णा ने 93.07% गुण घेऊन महाविद्यालयात सर्व द्वित्तीय तर चि. हजारे बलराज गोविंद ने 91.69% गुण घेऊन महाविद्यालयात सर्व तृतीय आला आहे.
90.00% पेक्षा अधिक गुण संपादन करणारे 07 विद्यार्थी तर 85.00% पेक्षा जास्त गुण घेणारे 07 विद्यार्थी आहेत. यात अर्थशास्त्र, पाली व संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण विद्यार्थ्यांनी संपादन केले आहेत. तसेच विशेष प्राविण्यासह 47, प्रथम श्रेणी 109, द्वितीय श्रेणी 169 व तृतीय श्रेणीत 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयातील 85% पेक्षा अधिक गुण संपादन करणारे विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत…
कु. चव्हाण दिशा दयानंद 94.92%
कु. सर्जे आरती गोपाळ 93.07%
चि. नाईक प्रत्युक्ष श्रीकृष्ण 93.07%
चि. हजारे बलराज गोविंद 91.69%
कु. तेली पूजा शिवाजी 90.61%
कु. ठाकरे रजनी हनुमंत 90.46%
कु. पातळे सिद्धेश्वर रामराव 88.46%
कु. मेटे अश्विनी गोरोबा 88.30%
चि. सुरकांबळे यश अशोक 88.15%
चि. जाधव आदर्श शाहुराज 87.23%
कु. चिवडे योगिता ज्योतिराम 86.61%
चि. दुधाळे शैलेश विनायक 85.69%
कु. जोशी रेणुका अनिरुद्ध 85.53%
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष तथा विज्ञान महाविद्यालय शालेय समिती अध्यक्ष मा.अरविंदजी सोनवणे,उपाध्यक्ष तथा कला महाविद्यालय शालेय समिती अध्यक्ष मा.ललीतभाई शहा, उपाध्यक्ष तथा वाणिज्य महाविद्यालय शालेय समिती अध्यक्ष मा.रमेशकुमार राठी, सचिव मा. रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव मा. सुरेशजी जैन, संस्था सदस्य मा. विशालजी लाहोटी, मा. विशालजी अग्रवाल, प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. श्रीराम सोळुंके, प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्रशासकीय अधिकारी प्रा.दासराव सूर्यवंशी,उपप्राचार्य डॉ. दिलीप जगताप, पर्यवेक्षक प्रा. मिलिंद माने, पर्यवेक्षक डॉ. अंजली बुरांडे, समन्वयक प्रा. सुभाष मोरे, उपप्राचार्य (क.म) अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, प्रा. शशिकांत स्वामी, परीक्षा विभाग प्रमुख डॉ.पी.बी दिक्षित, प्रा. शैलेश सूर्यवंशी, प्रा. सुरेश क्षिरसागर, प्रा. महेश जंगापल्ले, कार्यालयीन अधीक्षक श्री.नवनाथ भालेराव,अधीक्षक सुभाष एकतारे, अधीक्षक फय्याज पठाण, मुख्य लिपिक श्री. रमेश देशमुख, श्री विनोद घार, लेखापाल वशिष्ठ कुलकर्णी, श्री. रामकिशन शिंदे, श्री. विजय पारीक, श्री. सचिन वांगस्कर व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले.