लातूर : आज कोरोना महामारीच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स सेवा देत आहेत. माणूस आजारी पडला की देवाचा धावा करतो, सोबतच डॉक्टरांचा! कोरोनाच्या या काळात डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी मृत्यूच्या दाढेवून रूग्णांना जीवनदान मिळत आहे. प्रत्यक्ष या कामात असताना डॉक्टरांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. दिवसभर कीटचा त्यातून जीवाची जोखीम पत्करावी लागते. कितीतरी डॉक्टर या कोरोनाशी लढतात, रुग्णांना सेवा देताना ते कोरोना बाधीत झाले यातच काहींना प्राण गमवावे लागले. आपल्या समोर मृत्यू दिसत असतानाही झोकून देऊन रूग्णसेवा करणे हे खरोखरच खूप मौलिक योगदान आहे. या कर्तृत्वास सलाम म्हणून दयानंद शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, इन्टिट्युट आॅफ फॉर्मसी, फॉर्मसी महाविद्यालय, वास्तुशास्त्र महाविद्यालय अशा सर्व महाविद्यालयाच्या वतीने शासकीय व खाजगी डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वौद्यकीय विज्ञान संस्था, लातूर, डॉ. विश्वास कुलकर्णी, अध्यक्ष, लातूर शाखा, अखिल भारतीय वौद्यकीय संघटना व डॉ. मंगेश सेलूकर त्यांचा सत्कार करून सन्मानपत्र देण्यात आले.
पंढरपूर निवासी दयानंद औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांनी डॉक्टर म्हणजे साक्षात पंढरीचे विठोबा आणि रुक्माई होय. आषाढी एकादशीच्या दिवशी नेमका ‘डॉक्टर्स डे’ चा योग साधून आम्ही त्यांची पूजा बांधली आहे अशा शब्दात डॉक्टरांचा गौरव केला.याप्रंसगी मनोगत व्यक्त करताना दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोळुंके म्हणाले की डॉक्टर कोरोना काळातच नव्हे तर नेहमीच त्यागाची मूर्ती आहेत. समाज त्यांच्याप्रती ऋणी आहे. डॉ. गिरीश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना हा सत्कार म्हणजे आमच्याप्रती समाजाने दाखवलेले हे प्रेम आहे. आम्ही या प्रेमास पात्र राहू असे वर्तन करतो आणि समाजानेही आमच्याप्रती प्रेमादर राखावा असे दोन्ही बाजूंनी हे नाते अखंड रहावेत अशी इच्छा बोलून दाखवली. डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी कोरोनाच्या या काळात स्वच्छता राखणे, मास्कचा वापर करून आपण सुरक्षित रहावे, समाज सुरक्षित राहावा तसेच डॉक्टर सुरक्षित राहील. याची काळजीही आपणच घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. शिवाजी गायकवाड यांनी दयानंद शिक्षण संस्थेने कोरोना काळात समाजाप्रती जबाबदारी ओळखून करत असलेल्या उपक्रमांची नोंद घेत पुढेही हे अखंड व्रत चालू राहील असे सांगून डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त केला. डॉक्टरांना देण्यात आलेले सन्मानपत्राचे शब्दांकन करणाऱ्या डॉ. सुनीता सांगोले यांनी या सन्मानपत्राचे वाचन केले. डॉक्टरांच्या योगदानावरच सर्व सामान्य माणसांच्या मनात असलेला आदर त्यांच्या त्यागाबद्दलच्या गहिवर, या भावना प्रस्तुत सन्मानपत्राच्या निमित्ताने आम्ही देत आहोत असे म्हणून डॉक्टरांच्या कर्तृत्वाला सलाम केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप नागरगोजे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. विलास कोमटवाड यांनी केले.
या कार्यक्रमास कला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम साळुंके इन्सिटिट्युट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला, कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. क्रांती सातपुते, विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पुनम नथानी, पर्यवेक्षक प्रा.डॉ. दिलीप नागरगोजे, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.