दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने सोमवारी फेसबूकवरुन लाईव्ह मार्गदर्शन ! 

'कोव्हिड 19 च्या काळातील विद्यार्थी गुणवत्ता विकासातील दयानंद शिक्षण संस्थेची भूमिका '


 


  लातूर. दि. ( लातूर) राज्यात शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने दयानंद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालात घेतलेली गरूड झेप आणि विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा विकास या विषयावर सोमवार दि. २७ जुलै ऑनलाइन फेसबुक द्वारे लाईव्ह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. दासराव सुर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. दिलीप जगताप, कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी , वाणिज्य महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक डॉ. अंजली बुरांडे हे आपल्याशी संवाद साधणार आहेत.


     कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे विद्यार्थी व पालकांनी घरी बसूनच ऑनलाइन द्वारे   


http://www.facebook.com/onlinedsclatur/


या लिंकवर जाऊन फेसबुक लाईव्ह  


मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी उपाध्यक्ष मा. अरविंदजी सोनवणे , मा.ललितजी शहा, मा.रमेशजी राठी, सचिव मा. रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य


 डाॅ.जयप्रकाश दरगड , वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. श्रीराम सांळुके, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. शिवाजी गायकवाड यानी केले आहे.