दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री . रमेशजी बियांनी यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमाने साजरा.

   लातूर.  आज दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव  मा.रमेशजी बियाणी साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. जगात व देशात cove-19 थैमान घालत आहे तरी आपला आतला आवाज मदतीचा शांत बसू देत नाही म्हणून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना फोन वरून अत्यंत बिकट परस्थीतही धिर देण्याचे कार्य कले  हे शैक्षणिक वर्ष 2006 पासून आजतागायत शिक्षण संस्था सचिव पदी विराजमान आहेत. त्यांनी शिक्षण संस्थेचा नावलौकिक प्राप्त करून देण्याकरिता अनेक उपक्रम राबविले आहेत.यातच भारताचे तत्कालीन राष्ट्रपती महामहीम प्रणव मुखर्जी यांनी या संस्थेला भेट देऊन शिक्षण संस्थेचा गौरव केला.शैक्षणिक क्षेत्रात कौशल्याभिमुख उपक्रम राबवून विद्यार्थी हिताय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थीच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील आहेत.तसेच covid-19 महामारी च्या कालखंडात सामाजिक भान राखत लातूर शहरातील covid-19 योध्दाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मास्क व सॅनिटायझरचे संस्थेच्या वतीने मोफत वितरण करून सामाजिक दायित्व व गरजू व गरीब विद्यार्थ्यां लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्याचे किट पोहोचवून कौटुंबिक दायित्व व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक दायित्व निभावण्याचे कार्य अविरतपणे चालू ठेवणारे व शिक्षणाची दिव्य दृष्टी लाभलेल्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात अॅला.